लातूर : प्रतिनिधी
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित गेल्या आठ दिवसापूर्वी घसरलेल्या भाजीपाल्याची आवक दि. १७ मे रोजी काहि प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले आहे. मागील काहि दिवसापुर्वी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटत होती. मात्र सध्या बाजार समितीत आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे. गत आठवड्याच्या तूलनेत शनिवार बाजार समितीत ४१२ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे.
शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीत ग्रामीण भागासह शेजारील जिह्यातून तसेज शेजारी राज्यातून भाजीपाल्याची मोठया प्रमाणावर आवक होते. गेल्या दोन महिन्यापासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही काहि प्रमाणात कमि-जास्त होत आहे. गत आठवड्याच्या तूलनेत शनिवार बाजार समितीत पुन्हा भाजीपाल्याची आवक वाढली असल्याचे दिसून आले आहे. सध्या बाजार समितीत हिरवी मिरची, शेवगा, दोडका, फुल गोभी, गवार, कारले या भाज्या सोडल्या तर आदी भाज्यांना अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग मात्र चिंतेत पडला आहे.
उच्च प्रतिचा भाजीपाला बाजारपेठेत येत असल्याने भाजीपाल्याच्या दरात काहि प्रमाणात भाववाढ झाली असल्याचे आडत व्यापा-यांनी सागीतले. परंतु काही दिवसांपूर्वी काहि भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या दरातही घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून मागणीच्या तुलनेत काही भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होत नसल्याने अवघ्या काहीच दिवसांत पुन्हा किरकोळ भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारात हिरवी मिरची, शेवगा, दोडका, फुल गोभी, गवार, कारले आदी दैनंदिन भाज्यांना मोठी मागणी असते. परंतु याच भाज्यांची आवक घटल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. तर शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडे प्रतिकिलो भेंडी, टमोटो, काकडी, मेथी, पालक, फ्लॉवर आदी भाज्या ३० ते ५० रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. तर काहि भाज्या अगदी कवडी मोल भावात विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.
शहरातील बाजार समितीत वागें १२ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, भेंडी १० किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी ४० किंव्टल आवक होवून ८० रूपयांचा दर मिळाला, फुल गोभी ३१ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, दोडका ४ किंव्टल आवक होवून ६०० रूपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ३७ किंव्टल आवक होवून १० रूपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे ७० किंव्टल आवक होवून १० रूपयांचा दर मिळाला, गवार २ किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, पालक १ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, शेपू ३ किंव्टल आवक होवून २५० रूपयांचा दर मिळाला, गाजर १५ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, भोपळा ११ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला,
कोथिंबीर ३४ किंव्टल आवक होवून २८० रूपयांचा दर मिळाला, हिरवी मिरची १८ किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची १६ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, शेवगा ३८ किंव्टल आवक होवून ३४० रूपयांचा दर मिळाला, मेथी १० किंव्टल आवक होवून ११०० रूपयांना १०० नगाचा दर मिळाला, कांदापात २ किंव्टल आवक होवून ८०० रूपयांचा १०० नगाचा दर मिळाला, लिंबु १३ किंव्टल आवक होवून ५०० रूपयांचा दर मिळाला, काकडी १५ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला आहे. कारले ८ किंव्टल आवक होवून ५०० रूपयांचा दर मिळाला, भुयमुगाच्या शेंगा ११ किंव्टल आवक होवून ३४० रूपयांचा दर मिळाला आहे. बिट २ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला आहे.