नाशिक : प्रतिनिधी
शाळा म्हणजे शिक्षणाचे मंदिर. पण नाशिक जिल्ह्यातील एका शाळेतील प्रकाराने पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलेल्या आक्षेपार्ह वस्तूंमुळे खळबळ उडाली आहे. शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. त्यावेळी दप्तरातून काही धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून फायटर, सायकलची लोखंडी चेन, धारदार चाकू, लोखंडी कडे, कंडोमची पाकिटे आणि पत्त्यांचे कॅट. विशेषत: अमली पदार्थही सापडले आहेत.
या आक्षेपार्ह वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्यामुळे पालक आणि शिक्षकांना धक्काच बसला. शिक्षकांनी सांगितले की, हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही जण शाळेतच अमली पदार्थांचे सेवन करत होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग चिंतेत असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.