23.8 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeलातूरआडतीतील सोयाबीनचे ३०० कट्टे भिजले

आडतीतील सोयाबीनचे ३०० कट्टे भिजले

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका व्यापा-याच्या आडत दुकानात अतिवृष्टीचे पाणी शिरूर साधारणत: सोयाबीनचे तीनशे कट्टे भिजून १३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील आडत व्यापारी लक्ष्मण चंद्रकांत पिचारे यांच्या आडत दुकानांमध्ये सोयाबीनची तेराशे कट्टे ठेवण्यात आले होते.
अतिवृष्टीमुळे आडत दुकानाच्या पाठीमागील दरवाज्यातून पावसाचे पाणी शिरून थप्पीच्या खालीच्या बाजूची साधारणत: ३०० कट्टे  भिजून या अडत व्यापा-याचे १३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी बालाजी भोसले यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे.  अतिवृष्टीमुळे या अडत व्यापा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व्यापा-यातून हळ-हळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR