33.4 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रआता कंटाळलो!

आता कंटाळलो!

इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार

अहिल्यानगर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमधील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यामुळे व्यथित झालेले इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. २-३ दिवसांत कीर्तन थांबवण्याचा निर्णय ते घेणार आहेत. त्याबाबत विचार सुरू असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले.

मला घोडे लावा, माझा पिंड गेला.. पण माझ्या मुलीचा यात काय दोष आहे? ३१ वर्षे झाली, आता बास झालं. थांबायला हवे. दोन दिवसांत कीर्तन थांबवण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे म्हटल्याचे व्हीडीओत दिसत आहे. मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यावरून बातम्या केल्या, त्यावरून इंदुरीकर महाराज व्यथित झाल्याचे व्हीडीओत दिसतेय. त्यामुळे त्यांनी कीर्तन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत ते एक व्हीडीओ जारी करत माहिती देणार असल्याचे व्हीडीओतून समजते.

पोरं लहान असताना ८-८ दिवस गाठभेट होत नव्हती. आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावर कपडे काय आहेत? यावर कमेंट्स करतात. यापेक्षा वाईट काय आहे. ४ दिवसांपासून मुलीच्या अंगावरील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या आहेत.
मला घोडे लावा हो.. माझा पिंड गेला आहे. पण माझ्या मुलीचा-मुलाचा काय दोष आहे. पण या कॅमे-यावाल्यांनी आठ दिवसांत जगणं मुश्कील केलं आहे. मुलगी तुम्हाला आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर कुणी कमेंट केले तर तुम्हाला काय वाटेल. मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडील घेतात की मुलीकडील घेतात? कपडे त्यांनी आणले असतील की मी आणले असतील. पण एवढी क्लीप टाकणा-यांना तरी लाज वाटली पाहिजे ना, असा संताप इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR