25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रआता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ

आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.

या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, आता या सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आपली जागा दाखवली आहे. काल बजेट सादर केले, घोषणा केल्या पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर सरकारकडे नाही. घोषणांचे पालन पूर्णपणे शून्य आहे. सरकार आता खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत आहे.
बोलाचाच भात अन् बोलाची कढी
वारकरी पंथाचे लोक येऊन गेले. वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसे येईल, याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. निरर्थक गवगवा सरकार करत आहे. शेतक-यांचे कर्ज माफ केले नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असे सगळे झाले आहे. या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

चव्हाण प्रकरणाचा सीडीआर हवा
दरम्यान, नाना पटोले यांनी पूजा चव्हाण प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट मागितले आहेत. याबाबत त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्याचे मंत्री संजय राठोड यांचे जे प्रकरण झाले होते. त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आता फडणवीस हे गृहमंत्री आहेत. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला नाही तरी फडणवीसांनी क्लीन चिट दिली. डाऊटफुल मंत्री जर सरकारमध्ये असेल आणि सरकार चूप असेल तर सरकार सहभागी आहे का? आम्हाला सीडीआर हवा आहे. आम्हाला रिपोर्ट पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR