लातूर : प्रतिनिधी
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री उशिरा स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला ४० तासाहून अधिकाचा काळ उलटला आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर ऑपरेशन करण्यात आल्याने आता त्यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, आता पुढील उपचारासाठी लातूर येथील हॉस्पिटल ते विमानतळ येथे ग्रीन कॉरिडर करण्यात आला होता. त्यानंतर एअर अॅम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईला हलविण्यात आले.
पुढील उपचार त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे होणार आहेत. लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:च्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यात ते बचावले. त्यानंतर सोमवारी मनोहरे यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
सोमवारी (७ एप्रिलला) साडेदहा ते अकराच्या दरम्यान एअर अॅम्बुलन्सद्वारे मनोहरे यांना लातूर विमानतळावरून मुंबईकडे नेण्यात आले. मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामधून ते बचावले आहेत.
शनिवारी रात्री त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी गोळी झाडल्यानंतर कवटीचे हाड मेंदूत अडकले होते. त्यावर लातूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मेंदूच्या काही भागात संवेदना कमी आहेत.
त्यासाठी पुढील उपचार करण्यासाठी बाबासाहेब मनोहरे यांना मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किनीकर यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे.
लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल ते लातूर विमानतळ दरम्यान ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. त्यानंतर लातूर विमानतळावरून एअर अॅम्बुलन्सद्वारे मनोहरे यांना मुंबईकडे नेण्यात आले. लातूर येथील हॉस्पिटलमध्ये मनोहरे यांच्यावर काही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्टल, रिकामी बुलेट, दोन मोबाईल व काही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे. त्यामुळे या मागचे नेमके कारण हे अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी मात्र पोलिसांकडून किंवा त्यांच्या कुटुंबांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.