26.1 C
Latur
Sunday, July 7, 2024
Homeलातूरआदमनगर, याहिया कॉलनीतील रस्ते दुरूस्त न झाल्यास आंदोलन

आदमनगर, याहिया कॉलनीतील रस्ते दुरूस्त न झाल्यास आंदोलन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील आदमनगर, याहिया कॉलनी, बु-हाणनगर, अब्दुल कलामनगर, महाराणा प्रतापनगर, बादाडेनगरमधील रस्ते व नाल्यांची  दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्ते अधिक खराब झाले आहेत. पायी चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्यांची  दुरुस्ती करावी, दुरुस्ी नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष मोहसीनखान यांनी दिला आहे.
उपरोक्त भागांमध्ये रस्ते, नाल्या, लाईट पाणी, कचर-याचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक जगण्यासाठी तारेवरची कसरत करीत असतात, वृद्ध, शाळेतील विद्यार्थी यांची रस्त्यांअभावी गैरसोय होत आहे. यासंदर्भाने स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेने दि. २० जून २०२४ रोजी मनपा कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी मनपा प्रशासनाने उपरोक्त प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, आजतागायत ते प्रश्न सुटले नाहीत. मनपा प्रशासनाने हे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मोहसीनखान यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR