22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयआदित्य-एल-१ मधून प्रथमच टिपले सूर्याचे फोटो

आदित्य-एल-१ मधून प्रथमच टिपले सूर्याचे फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात झेपावलेल्या आदित्य एल-१ वर या भारतीय अंतरळयानाने सूर्याची अत्यंत जवळून पहिल्यांदाच छायाचित्रे टिपली आहेत. हे या मोहिमेतील मोठे यश मानले जात आहे. दि सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे (एसयूआयटी) ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी सौर निरीक्षण आणि संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

२०० ते ४०० नॅनोमीटरच्या वेव्हलेन्थ रेंजमध्ये सूर्याच्या अनेक प्रतिमा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सूर्याचा दृश्यमान पृष्ठभाग आणि त्याच्या अगदी वरचा पारदर्शक थर दिसत आहे. तसेच सूर्यावरील ठिपके, फ्लेअर्स आणि प्रॉमिनन्स यांसह विविध सौर घटना समजून घेण्यासाठी हे स्तर महत्त्वपूर्ण आहेत. ज्याचा अवकाशातील हवामान आणि पृथ्वीच्या हवामानावर गंभीर परिणाम होऊ शकतो. एसयूआयटीला २० नोव्हेंबर २०२३ रोजी कमांड देण्यात आली. त्यानंतर यशस्वी प्री-कमिशनिंग टप्प्यानंतर ६ डिसेंबर २०२३ रोजी तिने पहिल्यांदा प्रतिमा कॅप्चर केल्या.

अकरा फिल्टर्स वापरले
सूर्याच्या वातावरणाचे तपशीलवार निरीक्षण मिळवण्यासाठी दुर्बिणीत ११ भिन्न फिल्टर्स वापरण्यात आले. सूर्याचे ठिपके, प्लेज प्रदेश आणि सूर्याची शांत बाजू यासारखी वैशिष्ट्ये यामध्ये दिसतात. हे फिल्टर्स शास्त्रज्ञांना चुंबकीय सौर वातावरणाच्या डायनॅमिक कपलिंगचा आणि पृथ्वीच्या हवामानावर सौर किरणोत्सर्गाच्या प्रभावांचा अभ्यास करण्याची परवानगी देतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR