17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरआदिनाथच्या गाळपास आलेल्या उसाचे सत्तावीसशे रुपये प्रमाणे धनादेश शेतकऱ्यांना वाटप सुरू

आदिनाथच्या गाळपास आलेल्या उसाचे सत्तावीसशे रुपये प्रमाणे धनादेश शेतकऱ्यांना वाटप सुरू

करमाळा : प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या दिवशी आलेल्या उसाचे प्रति टन 2700 रुपयांनी ऊस बिल शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आले. तोडणी वाहतूकदारांना वाहतुकीच्या रकमेवर साठ टक्के कमिशनसह रक्कमेचे धनादेश देण्यात आले. शिवाय एक किलोमीटर ते पंधरा किलोमीटर अंतरावरील ऊसाला 15 किलोमीटरची वाहतूक देणे

व 15 किलोमीटर ते 30 किलोमीटर अंतरातील ऊसाला तीस किलोमीटरची वाहतूक देणे हा निर्णय प्रशासन मंडळांनी घेतल्यामुळे वाहतूकदारांचा फायदा होणार आहे. प्रशासकीय संचालक महेश चिवटे संजय गुटाळ कार्यकारी संचालक बागनवर शेती खात्याचे प्रमुख विजय खटके,मंगेश मंगोडे,बप्पा वळेकर यांच्या उपस्थितीत धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे अत्यंत अडचणीच्या काळात हा कारखाना सुरू होत आहे जाणीवपूर्वक अनेक मंडळी हा कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.सभासदांचा कारखाना सभासदांनीच वाचवणे आता गरजेचे आहे.नुकसान न पाहता आपल्या तालुक्यातील संस्था व आपल्या तालुक्यातील सहकाराचे मंदिर वाचवण्यासाठी प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस द्यावा.

कारखान्याकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे वाहनांचे करार झालेली नाहीत असे असताना सुद्धा ऊस उत्पादकांनी व वाहनधारकांनी भविष्यकाळ डोळ्यापुढे ठेवून आदिनाथ चालवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.येणाऱ्या उसाची रोख रक्कम व ऊस तोडणी वाहतूकदारांची रोख रक्कम देण्याचे नियोजन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR