22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeलातूरआदिशक्तीचा गजर करीत उत्साहात घटस्थापना

आदिशक्तीचा गजर करीत उत्साहात घटस्थापना

लातूर : प्रतिनिधी
आईला राजा मानून तिचा उदोकार करीत दि. ३ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणच्या आई जगदंबेच्या मंदीरात व विविध नवरात्र महोत्सव मंडळाच्या सभापंडपात घटस्थापना झाली. आई जगदंबेचा गजर विविध मंदिरांतून तसेच विविध मंडळाच्या नवरात्रोत्सवात झाला. भक्तांच्या उत्साहाला उधान आले आहे. येत्या दहा दिवसांत विविध धार्मिकसह सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
येथील गंजगोलाईतील श्री जय जगदंबा मंदिरात दुपारी १.०५ वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री व सौ शिवशंकरप्पा बिडवे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. प्रारंभी आई जगदंबेची मिरवणूक गंज गोलाईतुन काढण्यात आली. वाजता-गाजत आई राजा उदो उदो…च्या गजरात माता जगदंबेची मुर्ती मंदिरात आणण्यात आली. यानंतर विधीवत महापुजा करण्यात येऊन घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर पारशेट्टी, सचिव बसवंतप्पा भरडे, राजेश्वर डांगे, वीरभद्र वाले, अ‍ॅड. गंगाधरप्पा हामणे, मल्लीनाथप्पा मेंगशेट्टे, शांतेश्वर बरबडे, संजय हत्ते, निलेश औरादे, कुमारपार शेट्टी, प्रा. बावगे, हरिष कटारिया यांच्यासह संस्थेचे विश्वस्त व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
गांधी मार्केटमधील श्री अंबिका मंदिरात सकाळी ११.३५ वाजता डॉ. पी. आर. जोशी यांच्या हस्ते घटस्थापना झाली. महात्मा गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात दुपारी १.०५ वाजता घटस्थापना करण्यात आली. जुना औसा रोडवरील श्री कालिका देवी मंदिरात सकाळी ७ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दीक्षित यांच्या हस्ते घटस्थापना झाली. सोनानगरमधील श्री कुलस्वामिनी माता भवानी मंदिरात दुपारी १२ वाजता सौ. व श्री अमोल पाटील, सौ. व श्री. बबनराव वीर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. झिंगणप्पा गल्लीतील भवानी चौकातील जयभवानी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने घटस्थापना करण्यात आली. तसेच शहरातील विविध मंडळांच्या नवरात्र महोत्सव समित्यांच्या वतीने उत्साहात घटस्थापना करण्यात आली. श्री कुलस्वामिनी नवरात्र महोत्सव मंडळ गावभागच्या वतीने जय जगदंबा देवीची भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR