लातूर : प्रतिनिधी
आधुनिक तंत्रज्ञान दुधारी तलवार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग जपून केला पाहिजे. मोबाईल लॅपटॉप इंटरनेट यांचा मर्यादित योग्य वापर केला पाहिजे. अन्यथा ते धोकादायक ठरु शकतात, असे प्रतिपादन लातूरचे नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे लातूर केमिस्ट संघटनेच्या आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात केले. यावेळी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉ. उदय मोहिते, केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास भोसले, सचिव अरुण सोमाणी, उपाध्यक्ष अनिल स्वामी, ओम बाहेती, अतुल कोटलवार, सत्यवान बोरळकर, प्रकाश साखरे आदी उपस्थित होते
पुढे बोलताना काळगे म्हणाले की केमिस्ट बांधव व्यवसायातील व्यस्ततेमुळे मुलांना योग्य तो वेळ देऊ शकत नाहीत, तेव्हा आईच्या मार्गदर्शनातच ही मुले यश मिळवतात त्याबद्दल सर्व भगिनींचे विशेष आभार मानले. केमिस्ट परिवारातील दहावी बारावी सीईटी नेट व्यवसायिक शिक्षण आदी ४६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. ओमप्रकाश भोसले, डॉ. संजय वारद, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. सतीश बिराजदार, बसवराज वळसंगे, बाबासाहेब कोरे, विश्वनाथन निरगुडे, रमेश बांगडिया, बालाजी थेटे, प्रकाश रेड्डी, ईश्वर बाहेती, नागेश स्वामी, नाथराव मुंढे, संगमेश्वर निला आदी संघटनेत जिल्हा व तालुका पदाधिकारी केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.