24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीय‘आप’ने भाजपविरोधात ‘वॉशिंग मशिन’ मोहीम केली सुरू

‘आप’ने भाजपविरोधात ‘वॉशिंग मशिन’ मोहीम केली सुरू

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात असताना पक्षाने ‘जेल का जवाब वोट से’ ही मोहीम दिल्लीभर राबवली होती. त्यानंतर आता ‘आप’ नवीन प्रचार मोहीम घेऊन दिल्लीकरांपुढे आला आहे. पक्षाचे मंत्री गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांनी आज ‘वॉशिंग मशिन’ मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेद्वारे ‘आप’ त्या नेत्यांची आणि इतर लोकांची नावे लोकांसमोर आणत आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे आणि ते भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये जाऊन स्वच्छ झाले आहेत.

मोहिमेचा शुभारंभ करताना गोपाल राय म्हणाले की, भारतीय जनता पक्ष म्हणत आहे की आम्ही ही निवडणूक भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशिनची काळी जादू काय आहे, हे आम्ही आमच्या प्रचारातून जनतेला सांगू यासाठी आम्ही वॉशिंग मशिन मोहिमेचे चार संच तयार ठेवले आहेत, जे चार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभेत जाऊन लोकांना दाखवले जातील.

भाजप २०० ते २२० जागांमध्ये गुंडाळणार

१३ मे रोजी लोकसभा मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले असून, आता काही माध्यमांव्दारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार भाजप देशभरात २०० ते २२० जागांवर गुंडाळणार असल्याचे चित्र आहे, असा दावा गोपाल राय यांनी केला असून, त्यामुळे जनतेला योग्य निर्णय घेता यावा यासाठी आम्ही आमचा दिल्ली आणि इतर ठिकाणी प्रचार आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे आणि वॉशिंग मशिन मोहिमेव्दारे भाजपमध्ये सामील झालेल्या भ्रष्ट नेत्यांची नावे जनतेसमोर ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR