17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआपल्यालासाठी २४ तास ३६५ दिवस ५ वर्ष उपलब्ध असणारे डॉ. काळगे यांना प्रचंड मतांनी...

आपल्यालासाठी २४ तास ३६५ दिवस ५ वर्ष उपलब्ध असणारे डॉ. काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसच्या काळातील चांगले दिवस आता पुन्हा आणायचे असतील तर सुशिक्षित, उच्चविद्या विभाषित, संवेदनशील, समाजाशी नाळ जोडलेले असे आपल्याला २४ तास ३६५ दिवस ५ वर्ष उपलब्ध राहणारे व्यक्त्तिमत्त्व  डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन महाराणा प्रतापनगर (म्हाडा कॉलनी) परिसरातील नागरिकांना करीत सर्वाधिक मताधिक्य बाभळगाव मधून मिळेल, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त्त केला आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा निवडणूक – २०२४ पार्श्वभूमीवर लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ म्हाडा कॉलनी (महाराणा प्रतापनगर) येथील राम चलवाड यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांसमवेत सुसंवाद बैठक पार पडली.
या बैठकीसाठी म्हाडा कॉलनी (महाराणा प्रतापनगर) सह सिकंदरपूर, सारोळा, सोनवती, आनंदवाडी येथील ग्रामस्थ, विविध संस्था पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महाराणा प्रतापनगर हे मूळ गाव बंजारा समाज बहुल गाव तर आहेच यासोबतच आपली उपजीविका भागविण्यासाठी जिल्ह्यातील इतर भागातून आलेले नागरीकदेखील येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. ज्यामुळे या गावाला स्थलांतरित लोकांचे एक गाव अशी या गावाची ओळख आहे. आपली उपस्थिती आपला उत्स्फूर्त सहभाग पाहता डॉ. शिवाजी काळगे यांचा विजय निश्चित आहे. आपणास आजवर आमदार निधी मिळत होता, आणि आता खासदार निधी देखील डॉ. शिवाजी काळगे आपल्याला दिल्लीतून खेचून आणतील यात शंका नाही. म्हाडा अंतर्गत मिळालेल्या घरांच्या कर्ज परतफेड व त्यावरील व्याज याचा प्रश्न मंत्रालय स्तरावरील असून तो सोडवण्यासाठी नक्की  प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
काँग्रेस सरकार राज्यात जसे बदलले तसे आपल्या आयुष्यातदेखील बरेच बदल घडून आले ते आपण जाणून आहेतच. आता पुन्हा पूर्वीचे चांगले दिवस आणायचे असतील तर  सुशिक्षित, उच्चविद्या विभाषित, संवेदनशील, समाजाशी नाळ जोडलेले असे व्यक्तिीमत्त्व    डॉ. शिवाजी काळगे असून ते आपल्याला २४ तास ३६५ दिवस ५ वर्ष उपलब्ध राहतील. त्यामुळे आपण त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित महाराणा प्रतापनगर (म्हाडा कॉलनी) परिसरातील नागरिकांना करीत सर्वाधिक मताधिक्य बाभळगावमधून मिळेल असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, लातुर लोकसभेचा उमेदवार आणि मतदान संघातील मतदार यांची भेट व्हावी परिचय व्हावा यासाठी ही सुसंवाद बैठक होत आहे.
या माध्यमातून मतदार आणि उमेदवार यांच्यातील एक नाते निर्माण होते आणि हे आपले नाते वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त्त करतो. आपले प्रश्न आजही १० वर्षानंतर प्रलंबित आहेत आणि आपले हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातील एक उमेदवार म्हणून मी आपल्या समोर असून आपल्या सामाजिक कार्य, जनतेप्रती असलेला प्रामाणिकपणा यावर मताचे दान देऊन मला विजयी करावे अशी विनंती केली. यावेळी प्रास्ताविक करताना एम. के. इनामदार यांनी बोलतांना लातुर लोकसभा मतदार संघातील आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे आपल्या भावना समजून त्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील आणि त्यासाठी आपण लातुर लोकसभेचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करुया, असे आवाहन केले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन समद पटेल, सभापती जगदिश बावणे, व्यंकटेश पुरी, संगीता पतंगे, गणेश एसआर देशमुख, इम्रान सय्यद, विकास कांबळे, प्रवीण पाटील, एम. के. इनामदार, तुकाराम आडे, राजकुमार पवार, माधव गंभीरे, युसूफ शेख, सत्तार, एन. ए. इनामदार, युसुफ पठाण, शिवाजी देशमुख यांच्यासह युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, ग्रामंस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR