बीड : मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर त्यांनी भाष्य केले. मुंडे साहेबांनी जो वसा आणि वारसा दिला. तो पुढे नेईन. पण तुम्हाला मान खाली घालायला लावू देणार नाही. सत्तेत असो नसो. मी आठरा पगड जातीच्या लोकांसाठी मी लढणार आहे. काल बराडे धनगर आरक्षणासाठी बसले होते. मी त्यांच्याजवळ होते. गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. आमचाही नाही. पण आमच्या ताटातून ओढून घेऊ नका ही विनंती आहे, असे भगवानगडावरील दसरा मेळाव्यातून मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणावर मोठे भाष्य केले.
राज्यात रक्तबिजासारखा जातीयवादी राक्षस उभे झाल्याचे विधान त्यांनी केले होते.
त्यांच्या विधानाचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. तर आरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी मोठे भाष्य केले. मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण आमच्या ताटातील हिरावून घेऊ नका असे आवाहन त्यांनी केले.
लोक म्हणायचे दसरा मेळावा होणार का. मी म्हटलं माहीत नाही. मी भगवान बाबांच्या दर्शनाला जाणार आहे. मी काही करत नाही. भगवान बाबांनी अनंत वेदना सोसल्या. त्या बाबांच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहता येत नाही. माझे वडील दसरा मेळाव्याला जायचे. एकदा मला गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला. त्यानंतर मी इथे आले. ११ वर्ष. एखादा रेकॉर्ड मोडला. तर दुसरा रेकॉर्ड तयार केला. सावरगाव लोकांना माहीत नव्हते. हे भगवान बाबांचे जन्म गाव आहे. आम्ही इथे बाबांची मोठी मूर्ती उभी केली. हे मी केले नाही. माझ्या कार्यकर्त्याने उभे केले. सरकारी मदतीतून हे स्मारक तयार झाले नाही, ऊसतोड कामगारांच्या घामातून ते तयार झाले आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
जातीयवादी रक्तबिज राक्षसांचे आव्हान
नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवींनी महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. तर देवीला प्रार्थना करते हे राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे, अशी विनंती मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.