लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम प्रभाग क्रमांक ५ मधील अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे प्रभाग अध्यक्ष असलम बाबूमियां शेख यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रभाग ५ मधील गुणवंत विद्यार्थी शेख मोहसीन ख्वॉजामियां, सय्यद अदनान मैनोद्दीन, शेख जैद साबेर या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, शेख ख्वॉजामियां, पवनकुमार गायकवाड, जय ढगे, मैनोद्दीन सय्यद, फारूक शेख, रोहित काळे, प्रवीण मगर आदी उपस्थित होते.