21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी

आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी

नागपूर : प्रतिनिधी
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी नागपूरमध्ये सुरू आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही सुनावणी पार पडत आहे. आजपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू असून आज आमदार दिलीप लांडे यांची पहिल्यांदा उलटतपासणी करण्यात आली. आमदार लांडे यांनी दिलेल्या एका उत्तरावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिश्किल टिप्पणी केली. तुमचे उत्तर भाषांतर करताना माझे डोके भिरभिरत आहे, असे नार्वेकर यांनी म्हटले.

मुंबईतील शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी लांडे यांनी माझ्या पक्षाने निर्देश दिले, त्यांच्या विरोधात काम केले नाही, असे म्हटले. यावेळी लांडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर २००५ मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला? त्यावर आमदार लांडे यांनी मी आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती आताच्या वस्तुस्थितीवर दिली आहे. मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. आता मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे.

त्यानंतर अ‍ॅड. कामत यांनी आमदार लांडे यांना काही प्रश्न केल्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध शिवसेनेने निवडणूक लढवल्या. बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का? असा प्रश्न केला. त्यावर दिलीप लांडे यांनी योग्य नाही. आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी या विचारांशी सुसंगत राहूनच आदरणीय ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली, असे उत्तर दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR