22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा

आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील चाडगाव आणि मोटेगाव येथे साडेपाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि ९३ लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
चाडगाव येथे गावांतर्गत रस्ता व नाली बांधकाम (५ लाख), गेटेड सिमेंट नाला बंधारा (४१.२२ लाख) या कामाचे भूमिपूजन आणि ग्रामपंचायत इमारत, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती, स्मशानभूमी शेड उभारणे, गावांतर्गत विविध रस्ते, पाणंद रस्ते, पाणी पुरवठ्यासाठी नवीन डीपी बसविणे या विविध (९३ लाख)  विकासकामांचे लोकार्पण आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मोटेगाव (ता. रेणापूर) येथे स्थानिक आमदार विकासनिधीतून मंजूर गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे (१० लाख) आणि  मोटेगाव- भोकरंबा-खानापूर-बिटरगाव-कारेपूर-रायवाडी- प्रजिमा १३ या रस्त्याची पुलाच्या दुरुस्तीसह सुधारणा करणे व मोटेगावात सिमेंट कॉक्रीट बांधकाम करणे (४ कोटी ८२ लाख) या कामाचे भूमिपूजन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, सर्जेराव मोरे, सुमित जाधव, लालासाहेब चव्हाण, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, अनुप शेळके, उमाकांत खलंग्रे, रमेश सूर्यवंशी, शेषराव हाके पाटील, उद्धव चेपट, तानाजी कांबळे, नागनाथ कराड, आशादुल्ला सय्यद, शिरीष यादव, विश्वनाथ कागले, प्रकाश सूर्यवंशी, प्रमोद कापसे, शहाजीराव हाके, प्रभाकर केंद्रे, साहेबराव ज्ञानदेव पवार, साहेबराव प्रल्हाद पवार, माणिकराव सोमवंशी, अनिल पवार, दशरथ सोमवंशी, केरबा शिंंदे, किशोर माने, शिवराज माने, बालासाहेब शिंंदे, रामहरी गोरे, राजाभाऊ माने, लालासाहेब माने, केशव माने, विकास सोमवंशी, गोंिवंद सोमवंशी, विठ्ठल मुसळे, ओमप्रकाश सोमवंशी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR