बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचे व्हीडीओ आणि फोटो तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर या हत्येमागचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत असतानाचा अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी ते संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून अनेकजण धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या भेटीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.