पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे-पाटील या एकमेकींच्या विरोधात उभ्या असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघींमध्ये वाद नेमका काय आहे, रोष काय आहे, कुठून सुरुवात झाली, याबद्दल रुपाली ठोंबरे पाटील यांनी आम्ही लाली लिपस्टिक लावून पद मागत नाही, मागे फिरून पद मागत नाही. असे सविस्तर भाष्य केले आहे.
दरम्यान फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलेचे चरित्रहनन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी देखील आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेला रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप करत आंदोलन केले होते. त्यामध्ये त्यांनी हातात घेतलेले पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते, त्यावरतीही रुपाली ठोंबरे यांनी भाष्य केले आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, चाकणकरांच्या विरोधात ते आंदोलन नव्हते. ते आंदोलन महिला आयोगाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीसाठी होते आणि चाकणकर सातत्याने म्हणतात, मी सुंदर दिसते म्हणून माझ्यावर टीका होते. त्यांच्याकडे दोन पद आहेत, एक राज्य महिला आयोग आणि दुसरे प्रदेशाध्यक्ष, माझे एक मत होते, की एक पद त्यांच्याकडे ठेवा आणि प्रदेशाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ महिला आहेत ज्या फार पूर्वीपासून काम करत आहेत त्यांना तुम्ही संधी द्या. तेव्हा चाकणकर म्हणायला लागल्या, नाही. नाही.
रुपाली पाटील यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे, राजकारणात आम्ही घरदार सांभाळून आमच्या घरच्यांचा विश्वास कमवून आम्ही कशासाठी काम करतो, पक्षात पदावर जाण्यासाठीच काम करतो, आम्ही लाली लिपस्टिक लावून पद मागत नाही, मागे फिरून पद मागत नाही. आम्ही पक्षात काम केलं असेल आमच्या कॉलिटीवर, आमच्या कामावर, कार्यशैलीवर ते पद मागतो आहे, असे रुपाली ठोंबरे-पाटील यांनी म्हटले आहे.

