27.1 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्रआम्ही सरकारसोबत!

आम्ही सरकारसोबत!

 सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

पुणे : सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थात आपण सगळे या काळात भारतीय आहोत. आपण देशासोबत आहोत. आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे. भारत सरकारने दिलेले ड्राफ्टिंग अप्रतिम आहे ते सगळ्यांनी वाचावे. त्याचे देखील कौतुक करता येईल.

भारताने सांगितले आहे की, हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केले नाही. हे सगळ्या भारतीयांना, तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो. ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली आहे, ज्यांना वीरमरण आले त्यांच्या घरच्याच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही. ही लढाई दहशतवादाविरोधात आहे हे भारताने सांगितले आहे. नाव काय दिले हे त्या-त्या सरकारच्या मनावर असते. भारतीय सैन्य जे करते त्याचे नेहमी मनापासून मी स्वागत करते. ते कर्तृत्ववान आहेत. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे. भारत हा एक आहे. राजकीय विषय नाही. आम्ही भारतासोबत आहोत हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितले होते. ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही सगळे भारतीय आहोत. देशाच्या ऐक्यासाठी पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत असे सांगितले होते. राजनाथ सिंह यांचे आणि सरकारचे कौतुक करायला हवे.

ही वेळ दहशतवाद्यांना हरवायची आहे
ही टीका-टिप्पणी, सूचना करायची वेळ नाही. आम्ही सगळे बैठकीत सांगितले होते. हे सगळं नाजूकपणे हाताळलं पाहिजे. या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शांत रहावे आणि कौतुक करावे. ही वेळ दहशतवाद्यांना हरवायची आहे. हे जग दहशतवादाच्या विरोधात आहे. भारत सरकार, पंतप्रधान आणि त्यांची सगळी टीम यांना सहकार्य करण्याची भूमिका हे सगळ्या नागरिकांचे कर्तव्य असायला हवे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR