28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रआयकर छाप्याचे निमित्त; राजकीय संघर्षाची ठिणगी : रामराजे निंबाळकरांचे आव्हान

आयकर छाप्याचे निमित्त; राजकीय संघर्षाची ठिणगी : रामराजे निंबाळकरांचे आव्हान

 

सातारा : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण तालुक्यातील दिग्गज नेते, रामराजे नाईक यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून सुरू असलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी रविवारी संपली. त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेले व्हॉट्सऍप स्टेटस आहे. केवळ १६ शब्दांचा त्यांचा स्टेटस राज्यात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सऍप स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे. ‘‘सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणार’’ अशा आशयाचा हा स्टेटस आहे. या माध्यमातून त्यांनी माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सऍप स्टेट्स नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आयकर विभागाच्या पाच दिवसांच्या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत फक्त २ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ती रक्कम देखील आयकर विभागाने परत केल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने पाच दिवस छापा टाकला होता. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा पडला. या छापेमारीत काही निष्पन्न झाले नाही, असा दावा संजीवराजे निंबाळकर यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR