मुंबई : वृत्तसंस्था
आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा तरुणांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. भारतातील आयटी कंपन्या लवकरच फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहेत. आयटी कंपन्यांकडून आता कॅम्पस इन्टरव् ू घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. यावेळी आयटी कंपन्या क्लाऊड कॉम्यूटिंग, टेडा आणि एआय या क्षेत्रात ज्ञान असणा-यांना संधी देणार आहेत.
आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून राबवल्या जाणा-या या भरती प्रक्रियेविषयी बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या आयबीएम, इन्फोसिस, टीसीएस आणि एलटीआयमाइंडट्री या कंपन्या लवकरच कॅम्पस इंटरव् ू घेणार आहेत. त्यासाठी या कंपन्यांकडून महाविद्यालयांना भेट दिली जात आहे. यावेळी मात्र निवड प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे.
आयटी क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या यावेळी मात्र काही निवडक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहेत. यावेळी प्रामुख्याने क्लाउड कंप्यूटिंग, डेटा अॅनालिटिक्स आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची माहिती असणा-यांना नोकरी दिली जाऊ शकते. त्यासाठी तरुण-तरुणींना ६ ते ९ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाऊ शकते.
ऑफ कॅम्पस जॉयनिंगही वाढणार
आगामी वर्षाच्या जुलै महिन्यापासून कॅम्पस इंटरव् ू घेतले जाणार आहेत. यासह अनेकांना ऑफ कॅम्पसच्या माध्यमातूनही नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये टीसीएस कंपनीकडून ४० हजार, इन्फोसिस कंपनीकडून २० हजार तर विप्रो कंपनीकडून १० हजार फ्रेशर्सना नोकरीवर घेतले जाणार आहे. त्यासाठी या कंपन्यांकडून तयारी केली जात आहे. विप्रो कंपनीत होणा-या भरतीबाबत एचआर हेड सौरभ गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वर्षानंतर आता आम्ही पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग चालू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कॅम्पस हायरिंग करताना गुणांची किमान मर्यादा ही ६० टक्क्यांहून ७० टक्के होऊ शकते.
स्कील, सोशल मीडियावर नजर
यावेळच्या कॅम्पस हायरिंगमध्ये शिक्षण, कौशल्य यासोबतच समाजमाध्यम खात्यावरही या कंपन्यांची नजर असणार आहे. उमेदवाराची संपूर्ण माहिती घेण्याचा यामागे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-यांसाठी यावेळी कॅम्पस इंटरव् ूच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.