35.1 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeलातूरआयुक्त मनोहरे यांचा मोबाईल सीडीआर पोलिसांना प्राप्त 

आयुक्त मनोहरे यांचा मोबाईल सीडीआर पोलिसांना प्राप्त 

लातूर : विनोद उगीले
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री उशिरा स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला ५ दिवसाहून अधिकाचा काळ उलटला असून आता त्यांयावर मुंबईतील कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.असे असतानाच मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, या घटने मागचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच असून पोलीसांनी त्यांच्या जप्त केलेल्या मोबाईलचा सीडीआर मागवला होता तो आता पोलीसांना प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांनी या घटने मागील कारणाच्या चौकशीस सुरूवात केली असून एमआयडीसी पोलीसांनी त्याच्याकडे घरकामास असलेल्या इतर कर्मचारी व सुरक्षारक्षक अशा जवळपास १४ जणांचे जबाब नोंदवले तरी ही या घटने मागील कारण अद्याप अस्पष्टच आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीसांनी जबाब नोंदवण्या बरोबरच घटनास्थळाचा पंचनामा ही केला आहे. तसेच जप्त मोबाईलचा सीडीआर ही एमआयडीसी पोलीसांनी मागवला होता. शनिवारी दिवसभरात त्यांचे अनेकांशी बोलणे झाल्याचे यातून समोर आले असून एमआयडीसी पोलीसांनी प्राप्त सीडीआरच्या अनुषंगाने चाकशी सुरू केली असले तरी अजून आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्ना मागील ठोस कारण समोर आलेले नाही. घटना घडून ५ दिवस उलटून गेले अद्यापही या घटनेमागील कारण समजू शकले नाही. आयुक्त मनोहरे यांचे कुटूंबियांनी अद्यापही जबाब दिला नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR