18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआरक्षणाबाबत मराठा समाजास झुलवत ठेवले

आरक्षणाबाबत मराठा समाजास झुलवत ठेवले

रेणापूर : प्रतिनिधी
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात शांततेत आंदोलने झाली . या आंदोलनाला  सर्वच राजकीय पक्षानी पांिठंबा देत आरक्षण मिळविण्यासाठी  आश्वासने  दिली मात्र अद्यापपर्यंत आरक्षण मिळाले नाही. केवळ समाजाला झुलवत ठेवत समाजाची  दिशाभूल करण्याचे काम  सत्ता भोगणा-या व सत्तेत नसलेल्या  राजकीय पक्षानी केले आहे. माझ्या हातात सत्ता द्या आरक्षणा विना सुशिक्षीत बेरोजगार तरुण तरुणीला रोजगार उपलब्ध करू देऊ, अशी हमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दिली.
       राज ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मराठवाडा ंिहदुत्त्वाने भारावलेला होता, आजही आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचा जन्म झाला. महानसंत शरदचंद्र पवार यांना वाटले आता धर्माच्या आणि ंिहदुत्त्वाच्या गोष्टी छाटायच्या होत्या. यातून लोकांना बाहेर कसे काढायचे, मग जातीचे राजकारण सुरू झाले. प्रत्येकाला आपली जात प्रिय असते पण दुस-याच्या जातीबद्दल द्वेष असणं इथेच संघर्ष सुरू होतो. नेमक्या लोकांनी याच गोष्टी केल्या आणि तुमची माथी भडकवली. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तरूण शेती सोडून शहरात चालले आहेत. मराठवाड्यात मुलीना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. त्याबरोबर मराठवाड्याात माणसे यायला तयार  नाहीत.
मुला मुलीच्या शिक्षणाकडे व नोक-याकडे लक्ष नाही. केवळ  जाती जातीत  भांडणे लावण्या चे काम सुरू आहे. मूलभूत प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही. माझ्या महाराष्ट्रातील मुलांना रेल्वेमध्ये नोक-या आहेत.  हेच मुलांना माहिती नव्हते. त्यावेळी मनसेच्या वतीने  आंदोलने  केली  त्याची केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर मराठीमध्ये प्रश्नपत्रिका  येऊ लागल्या. त्यामुळे हजारो मुला – मुलींना  रेल्वेमध्ये नोक-या  मिळाल्या. राज ठाकरे सत्ता नसताना करू शकतो तर उद्या माझ्या हातात सत्ता आली तर काय करेन. असे सांगून   लातूर ग्रामीण विधानसभा, अहमदपूर,औसा मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करावे,  असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR