32 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeक्रीडाआरसीबीचा फ्लॉप शो, गुजरात विजयी

आरसीबीचा फ्लॉप शो, गुजरात विजयी

बटलरची जोरदार फटकेबाजी, ८ गडी राखून मात
बंगळुरू : वृत्तसंस्था
शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्सचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने गुजरातला विजयासाठी १७० धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान अवघ्या २ विकेट्सच्या मोबदल्यात १३ बॉलआधी पूर्ण केले. गुजरातने १७.५ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून १७० धावा केल्या. जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.

तत्पूर्वी सलामीवीर शुबमन आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनीही बॅटिंगने योगदान दिले. गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला तर आरसीबीचा हा या मोसमताील आणि घरच्या मैदानातील पहिला पराभव ठरला. गुजरातसाठी विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर याने सर्वाधिक धावा केल्या. बटलरने ३९ बॉलमध्ये १८७.१८ च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट ७३ धावा केल्या. बटलरच्या या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकारचा समावेश होता.

तत्पूर्वी, साई सुदर्शनने चांगले प्रदर्शन केले. त्याचे अर्धशतक अवघ्या १ धावेने हुकले. साई सुदर्शनने ३६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. कॅप्टन शुबमन गिल याने १४ धावांचे योगदान दिले तर शेरफेन रुदरफोर्ड याने १८ बॉलमध्ये ३ षटकार आणि १ फोरसह नॉट आऊट ३० रन्स केल्या. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. परंतु बंगळुरूचे बॉलर गुजरातला धक्के देण्यात कमी पडले. त्यामुळे गुजरातचा ८ गडी राखून विजय झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR