29.1 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeलातूर‘आरसीसी’चे प्रा. मोटेगावकर ‘महाराष्ट्राचा महागौरव’पुरस्काराने सन्मानित

‘आरसीसी’चे प्रा. मोटेगावकर ‘महाराष्ट्राचा महागौरव’पुरस्काराने सन्मानित

लातूर : प्रतिनिधी
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्रमार्फत दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन दि. ३० जानेवारी रोजी कोल्हापूर येथे पार पडले. या महाअधिवेशनात लातूर येथील ‘आरसीसी’चे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते ‘‘महागौरव’’ पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक कामासोबतच सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये ही प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे भरीव योगदान आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक छत्रपती शाहूमहाराज, स्वागताध्यक्ष राजेश क्षीरसागर, अध्यक्ष  मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. ओमप्रकाश शेटे, अभिनेते गिरीश कुलकर्णी, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आदि मान्यवर उपस्थित होते.
डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने यांनी त्यांच्या भाषणात प्रा .मोटेगावकर यांंनी शेतमजूर, गरीब, होतकरु, मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना डॉक्टर, इंजिनियर घडविले तसेच १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातून एमबीबीएस व टॉप इंजिनियरिंग कॉलेजला पाठवणारे एकमेव इन्स्टिट्युट म्हणून आवर्जून सांगितले. महाराष्ट्रात असा एकही व्यक्ती नसेल ज्यांना ‘आरसीसी’ व प्रा. मोटेगावकर माहित नाहीत, असे होऊ शकत नाही असाही त्यांनी शेवटी नमूद  केले . त्यांच्या या गौरवाबद्दल महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR