24.2 C
Latur
Friday, September 5, 2025
Homeमनोरंजनआलिया भट्टच्या अंगठीची सर्वांना भुरळ

आलिया भट्टच्या अंगठीची सर्वांना भुरळ

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या अनोख्या स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे आऊटफिट असो, बॅग किंवा ज्वेलरी असो दरवेळी ती एका नव्या लूकमध्ये दिसून येत असते. अलिकडेच, आलिया भट्टच्या एका अंगठीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे तिच्या या अंगठीची जगाला भुरळ पडली आहे.

आलिया भट्टने घातलेली अंगठी ही हेल्थ ट्रॅकर आहे. या अंगठीला ऑरा रिंग असे म्हणतात. दिसायला ही अंगठी एक प्रकारच्या बँडसारखी असते. सोनं किंवा चांदीसारखी ही अंगठी दिसत असली तरी ती वेगळ्याधातूपासून तयार केलेली असते. पण सिल्व्हर किंवा गोल्ड कलरमध्ये ही अंगठी मिळते. या अंगठीचे वैशिष्टये म्हणजे मॉडर्नसह पारंपरिक दोन्ही लूकवर ही रिंग शोभून दिसते. सध्या गोल्डन कलरच्या या अंगठीला प्रचंड मागणी आहे.

ही ऑरा रिंग काही सामान्य अ‍ॅक्सेसरी नव्हे. आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही अंगठी एक स्मार्ट हेल्थ ट्रॅकर आहे. म्हणजेच तुमच्या शरीराच्या अनेक क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यास ही अंगठी मदत करते. तुमच्या झोपेचे क्लॉक, हृदय गती, शरीराचे तापमान आणि अगदी तणाव पातळीचे निरीक्षण ही रिंग करते. त्यामुळे ही रिंग घालून तुम्ही स्टायलिश लूक तर कॅरी करूच शकता शिवाय आरोग्याची काळजीही घेऊ शकता. यामुळेच या अंगठीने जगाला भुरळ घातली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR