18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रआळंदीत दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

आळंदीत दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

आळंदी : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवर सोबत राहणा-या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यात त्याला एका महिलेने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. आळंदी पोलिसांनी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महेश नामदेव मिसाळ (टोपणनाव मामा) (वय २८ वर्षे, रा. खोकरमोहा, ता. शिरुरकासार, जि. बीड) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली तर साथीदार महिला आरोपीवरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आळंदी येथे वारकरी शिक्षण देणारी खाजगी संस्था आहे. यात अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. यात आरोपी देखरेखीचे काम पाहत होता. शनिवारी ( दि.४) रोजी रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने ही मुले झोपली असताना त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस झाला असून, मुलांच्या आईने फिर्याद दिल्यावर महाराजाला गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR