22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रआळंदीजवळच्या धानोरेत कंपनीला भीषण आग

आळंदीजवळच्या धानोरेत कंपनीला भीषण आग

आळंदी : प्रतिनिधी
आळंदी शहाराजवळ मरकळ रोड, धानोरे फाटा येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बुधवारी (दि.१७) पहाटे तीन वाजता भीषण आग लागली होती.

ही आग आटोक्यात आणण्यात आळंदी नगर परिषद, पीएमआरडीए, पीसीएमसी अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे.

कंपनीमध्ये आगी दरम्यान स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरत होती. परिणामी अग्निशमन दलांकडून फोम मारा करून आग आटोक्यात आणली गेली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. सदर आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR