लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीला आबालवुद्धापासून लहानांपर्यंत सर्वजण उपवास करतात. त्यासाठी लागणारे साबुदाणा, भगर यांची मागणी वाढली असून रताळे, केळी आदी फळाची बाजारात मोठी प्रमाणात आवक झाली आहे. वर्षातून एकदा येणा-या या मोठया उपवासानिमित्त शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटक राज्यातून गेल्या तीन ते चार दिवसापासून रताळयांची आवक होत आहे. या रताळ्याला शनिवारी बाजार समितीत किमान भाव ३०० रुपये प्रति दहा किलो तर कमाल भाव ३५० रुपये प्रति दहाकिलो असल्याची माहिती बाजार समितीने दिली. आषाढी एकादशीचा फराळ १० टक्क्यांनी महागला आहे.
मागील चार दिवसापासून बाजारात रताळयांची जवळपास दोन ते तीन क्विंटल एवढी आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रताळयांची आवक वाढली असून भाव स्थिर आहेत. गतवर्षी आषाढी एकादशीला रताळयांची आवक कमी प्रमाणात झाली होती, अशी माहिती रताळी व्यापारी घुले यांनी दिली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजारात रताळयांची आवक सुरू झाली आहे. शहरातील बाजार समितीत येणा-या रताळ्याची आवह ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भागातून तसेच कर्नाटकातील काहि भागाजून रताळयांची आवक सुरू झालेली आहे. कर्नाटकातील रताळयांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील रताळयांची चव गोड असते.
कर्नाटकातील रताळी तुरट असतात. उपवासासाठी सोलापूरमधील लहान आकारांच्या रताळयांना चांगली मागणी असते. नवरात्रोत्सव, आाषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीला रताळयांची आवक मोठयÞा प्रमाणावर होते. शहरातील बाजार समितीत दहा किलो रताळयांना ३०० ते ३५० रुपये असा भाव मिळाला असून किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भावाने रताळयांची विक्री केली जात असल्याचे व्यापारी घुले यांनी सांगितले.