सोलापूर :प्रतिनिधी
आस्था रोटी बँक आणि आस्था फाऊंडेशन, यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात १५०० अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध आणि कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना फराळाचे वाटप करण्यात आले. सोलापुरतील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्थाच्या वतीने आषाढी चा प्रसाद म्हणुन भा ज पा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यावतीने विठ्ठलाची आरती व प्रसाद वाटप करण्यात आला.
त्यात शाबुदाणे खिचडी ,वेफर्स ,पेंडखजुर, लायनल शाबुदाणे,राजगिरा लाडु ,ताक ,भगर,आमटी, श्रीखंड अश्या फराळ पदार्थांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुखांमध्ये राजु हौशेट्टी , भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर , लायन्स क्लब चे अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी, दिनानाथ धुळम,
नरेंद्र करवा,अंकित झंवर,सुमित मर्दा,राजन लाड,विजय करवा,निलेश चौगुले,स्वप्निल माळी,राघवेंद्र स्वामी, संजीवन पंडित, हरीश उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.विजय छंचुरे ,कांचन हिरेमठ ,निलिमा हिरेमठ ,छाया गंगणे ,पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, संगिता छंचुरे ,ज्योत्सना सोलापूरकर ,स्नेहा वनकुद्रे , सुरेखा पाटील,निता आक्रुडे , अविनाश मार्चला, अर्चना कांबळे,स्वप्ना कांबळे,लक्ष्मी कुलकर्णी,श्रीदेवी बिराजदार आदींनी सहभाग नोंदवला.सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले.