21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरआसरा रेल्वे पुलाच्या कामातील अडथळे दूर करा

आसरा रेल्वे पुलाच्या कामातील अडथळे दूर करा

आ. सुभाष देशमुख यांनी केली महापालिका आयुक्तांशी चर्चा

सोलापूर –
शहरातील आसरा रेल्वे पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पार पाडून तीन महिने उलटले तरीही अतिक्रमण व संबंधित न जागेवरील अतिक्रमण आणि अडथळा येणारे वृक्ष तोडण्याची कार्यवाही न झाल्याने काम खोळंबले आहे. या संदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना भाजपचे आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.

सोलापूर शहरातील जुळे सोलापूरला होटगी रोडशी जोडणारा आसरा रेल्वे पुल छोटा आहे. हा रेल्वे पूल विस्तारित व्हावा. त्याची रुंदी वाढवावी यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामाची विनंती केली होती. त्याचा प्रस्ताव पाठविला.
त्यास मंजुरी मिळाली.ई निविदा प्रक्रिया ,व कार्य आदेश आदी बाबी पूर्ण झाल्या आहेत मात्र तीन महिने उलटूनही अद्यापही या पुलाचे काम सुरू नाही. यामुळे आ. सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी महापालिकेत आयुक्त शीतल तेली – उगले यांची भेट घेतली. चर्चा केली. यावेळी महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महापालिकेकडील अडचणी आहेत पुलाच्या संबंधित जागेवरील अतिक्रमण व आवश्यक असलेली झाडे काढून घ्यावयाचे आहेत. येथील जलवाहिनी स्थलांतरित करावयाची आहे, अशी तीन कामे प्रलंबित असल्याने या रेल्वे पुलाचे काम सुरू करता येणार नाही. या अडचणी दूर केल्यानंतर सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीतील अडचणी दूर कराव्यात. या विषयांवर चर्चा केली, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

रेल्वे पुलाच्या जागेवरील अतिक्रमण आणि बाधित झाडे काढण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने करावी तर येथील जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी एकूण ९ कोटी ५० लाख रुपये खर्च आहे. महापालिकेची आर्थिक क्षमता नाही. यामुळे राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन यांचा या कामासाठी हिस्सा आहे. या दोन्ही विभागाने संयुक्त बैठक घेऊन या निधी संदर्भात निर्णय घ्यावा. यासाठी महापालिका प्रशासन प्रस्ताव तयार करून पाठवणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR