31.6 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeलातूरआ. अभिमन्यू पवार यांचे शक्तिप्रदर्शन

आ. अभिमन्यू पवार यांचे शक्तिप्रदर्शन

औसा : प्रतिनिधी
औसा विधानसभा निवडणुकीसाठी  भाजपाचे  उमेदवार विद्यमान आमदार  अभिमन्यू पवार यांनी  विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत शंखनाद रॅलीद्वारे शुक्रवारी (दि. २५)   आपला उमेदवारी अर्ज  दाखल केला आहे . यावेळी त्यांच्या सोबत राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्तात्रय कोळपे, रिपाइंचे समाधान वाघमारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रदीप मोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख बंडू कोद्रे यांच्यासह भाजपाचे आनेक पदाघिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
औसा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आमदार अभिमन्यू पवार हे निवडणूक लढवित आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी विराट रॅलीद्वारे दाखल करण्यात आला. शहरातील छत्रपती संभाजी नगर येथून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी मतदारसंघातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. ही रॅली गांधी चौक, हनुमान मंदीर, जुने बस्थानक या मार्गावरुन तहसील कार्यालया समोर आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आगोदर कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आमदार म्हणून अभिमन्यू पवार  यांनी सर्व बाजूनी चांगले काम केले आहे. विकासाचे एक वेगळे पर्व मतदारसंघात सुरु झाल्याने याला खंड न देता ते पुढे सुरु राहण्यासाठी अभिमन्यू पवारांना साथ देण्याचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR