लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस दि. २१ मार्च रोजी लातूर शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करण्यात आला.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिका-यांनी लातूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात जाऊन ‘श्री’ चा अभिषेक करून आरती केली. त्यानंतर सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करून गंजगोलाई येथील आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन जगदंबा मातेची आरती केली. तसेच लातूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान केले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, अॅड. फारुख शेख, दगडूआप्पा मिटकरी, चंद्रकांत धायगुडे, गोरोबा लोखंडे, संभाजी सुळ, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, प्रा. प्रवीण कांबळे, दगडूसाहेब पडीले, राजा माने, यशपाल कांबळे, गोपाळ बुरबुरे, पवनकुमार गायकवाड, आसिफ बागवान, विजय गायकवाड, धनंजय शेळके, भाऊसाहेब भडीकर, सुलेखा कारेपूरकर, अभिषेक पतंगे, पिराजी साठे, युसुफ बाटलीवाला, युनुस शेख, अॅड. अंगद गायकवाड, करीम तांबोळी आदींसह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.