बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
भारताने बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. यानंतर इंग्लंडला ४०७ धावांवर भारताने रोखले. यामध्ये मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. इंग्लंडचा डाव हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथने सावरला होता. मात्र, हॅरी ब्रुक बाद झाल्यानंतर सिराजने इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे इंग्लंडला ४०७ धावांत रोखण्यात यश आले.
सिराजने ७० धावा घेत ६ विकेट घेतल्या. सिराजने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध यापूर्वी एका डावात पाच विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. यामध्ये हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथने शतकी खेळी केली. याच दरम्यान इंग्लंडचे सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले. त्यापैकी ५ फलंदाज सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाले. ओली पोप, बेन स्टोक्स, कार्स, टंग आणि बशीरला शुन्यावर सिराजने बाद केले.
मोहम्मद सिराज आणि आकाशदीपने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडला ४०७ धावांवर रोखले. भारताच्या इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. सिराजने ६ आणि आकाशदीपने ४ विकेट घेतल्या. इंग्लंडला ४०७ धावांवर रोखल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा डाव सुरु झाला. भारताला पहिल्या डावात १८० धावांची आघाडी मिळाली.