लातूर : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशन मिशन पिंक हेल्थ च्या अध्यक्षपदी डॉ. वैशाली दाताळ यांची तर सचिव पदी डॉ. राखी सारडा यांची निवड करून पदग्रहण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुक्ता मुंडे, कस्तुरी मुंडे, आयएमए महिला विंग अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ, पिंक हेल्थ मिशनच्या पूर्व अध्यक्ष डॉ. वंदा कुलकर्णी, पूर्व सचिव डॉ. रचना जाजू, डॉ. सुरेखा काळे, डॉ. माधुरी कदम, डॉ. दिपाली भोसले, डॉ. शिल्पा दाडगे, डॉ. सुवर्णा बिराजदार, डॉ. चांद पटेल, डॉ. हिना पटेल उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला डॉक्टर्स विंगने भारतातील किशोरवयीन मुलींचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी आणि मिशन पिंक हेल्थ म्हणजे किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता वाढवण्यासाठी सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींमधील अशक्तपणा कमी करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. भारताला एनिमिया मुक्त करणे आहे.