23.7 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रइंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची शासकीय गाडी फोडत त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हा हल्ला शहरातील संविधान चौकात करण्यात आला आहे.

पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ कारमधून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. तहसीलदार पाटील हे आज सकाळी ११.१५ च्या सुमारास तहसील कार्यालयाच्या दिशेने जात होते. इंदापूर पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणा-या संविधान चौकात हल्लेखोरांनी हल्ला केला.

यावेळी तहसीलदार पाटील आणि त्यांचे चालक मल्हारी मखरे हे गाडीमध्ये होते. हल्लेखोरांनी चालकाच्या दिशेने मिरची पूड टाकत संपूर्ण गाडी लोखंडी रॉडने फोडली. या धक्कादायक घटनेनंतर पाटील आणि चालक मखरे यांना इंदापूर उपजिल्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हा हल्ला वाळू माफियांकडून करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR