इराणचा पराभव करत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने आज (दि. २६) झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात इराणचा ३७-३४ असा पराभव करून तिसरे सुवर्णपदक जिंकले. या शानदार विजयामुळे गतविजेत्या भारतीय संघाने आपले सुवर्णपदक यशस्वीरीत्या राखले असून, भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात इराणने जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न केला, तरीही भारतीय खेळाडूंनी संयम राखला. सामना संपायला एक मिनिट बाकी असताना इराणला गुण मिळवणे गरजेचे होते, परंतु भारताच्या बचावफळीने ‘आयनाझ’वर महत्त्वपूर्ण पकड करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरीस भारताने ३७-३४ असा विजय मिळवत आपल्या पदकांच्या यादीत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.

भारताची पदकसंख्या २७ वर
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या संजू देवीने या निर्णायक सामन्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय संघाने इराणचे आव्हान यशस्वीपणे परतवून लावले. या सुवर्णपदकामुळे भारताच्या पदकांची एकूण संख्या २७ झाली आहे (यात ३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे) या पदकापर्यंत भारत पदक तालिकेत १२ व्या स्थानावर होता. भारताच्या सुवर्णविजेत्या महिला संघात पूजा, राज राणी, सोनाली विष्णू शिंगटे, पुष्पा, भावना देवी, रितू, संजू देवी, रितू नेगी, मनीषा कुमारी, पिंकी रॉय, ज्योती आणि निकिता यांचा समावेश होता.

आजच भारतीय पुरुष कबड्डी संघही मैदानात उतरेल; सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना इराणशी होणार आहे. तत्पूर्वी, सावन बरवालने पुरुषांच्या मॅरॅथॉनमध्ये २:११:३७ या वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत रौप्यपदक जिंकले. या कामगिरीसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरॅथॉन प्रकारात पदक जिंकण्यासाठी भारताने केलेली ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली.

आशि चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदर्सा विनोद यांनी महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले. वैयक्तिक अंतिम फेरीत तिलोत्तमा चौथ्या, तर विदर्सा पाचव्या स्थानावर राहिली. स्क्वॅॅशमध्ये, मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या टँग मिंग हाँग आणि ली का यी यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांनी कांस्यपदक जिंकले.

तिरंदाजीमध्ये पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली; धीरज बोम्मादेवरा याने ६९८ गुणांसह पुरुषांच्या रिकर्व्ह पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावतानाच आशियाई आणि राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केले. तसेच, महिलांच्या कंपाऊंड पात्रता फेरीत चिकिता तनिपार्थी हिने ७०५ गुणांसह पहिले स्थान मिळवले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news