16.7 C
Latur
Wednesday, November 26, 2025
HomeUncategorizedइराणमध्ये १० महिन्यांत १,००० लोक फासावर!

इराणमध्ये १० महिन्यांत १,००० लोक फासावर!

तेहरान : वृत्तसंस्था
इराणमध्ये गेल्या १० महिन्यात तब्बल १ हजार पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. इराणमध्ये फाशीची शिक्षा सामान्य आहे. पण २०२५ मध्ये इराणमधली परिस्थिती अधिक भयंकर बनली. मानवाधिकार संघटनांच्या एका आकडेवारीनुसार, या वर्षात इराणमध्ये तब्बल एक हजार पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवण्यात आले आहे.

इस्रायलविरुद्धच्या संघर्षानंतर इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसून येते. हेरगिरी, देशविघातक कारवाया, सरकारविरोधी आंदोलन पुकारणे, धर्माच्या विरोधात जाणे, अमली पदार्थाची तस्करी अशा अनेक गुन्ह्याखाली इराणी सरकारने शेकडो जणांना थेट फासावरच लटकवले आहे.

भारतात २० मार्च २०२० साली दिल्लीतील निर्भया हत्याकांडातील चार आरोपींना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात भारतात एकाही गुन्हेगाराला फाशी देण्यात आलेली नाही.

इराणी कायदे हे भारतासारखे पारदर्शक नाहीत. इराणमध्ये फाशीची शिक्षा ही सरकार आपली पकड कायम ठेवण्यासाठी वापरत असलेली दडपशाहीची प्रतिकात्मक यंत्रणा आहे. राजकीय विरोध दडपण्यासाठी वापरले जाणारे हे हत्यार आहे. इथे जनतेला हेच दाखवण्याचा प्रयत्न असतो, आमच्या विरोधात गेलात तर शेवट फार वाईट होईल!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR