23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराण-लेबनॉनच्या धमक्या सुरूच; इस्रायलचा हिजबुल्लाहवर हल्ला

इराण-लेबनॉनच्या धमक्या सुरूच; इस्रायलचा हिजबुल्लाहवर हल्ला

तेहरान : वृत्तसंस्था
इराणमध्ये हमासचा नेता इस्माईल हानियाच्या हत्येनंतर मध्य पूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने इस्माईल हानियाच्या मृत्यूचा बदला इस्रायलकडून घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळं मध्य पूर्वेतील तणाव वाढताना दिसून येत आहे. यादरम्यान, इस्रायली सैन्यानं हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं नष्ट करण्यात आल्याची माहिती आयडीएफने दिली. इराण आणि लेबनॉनच्या धमक्यांच्या दरम्यान हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलने हल्ला केला. ३१ जुलै रोजी राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलला धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आता इराण कधीही युद्ध करु शकते, असे म्हटले जात होते.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्ल्ािंकन यांनीही इराण आणि हिजबुल्लाहच्या या धमक्या पाहता हे देश इस्रायलवर कधीही हल्ला करू शकतात, असं म्हटले होते.

हिजबुल्लाहनेही इस्रायलला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. हिजबुल्लाहने गेल्या शनिवारी इस्रायलवर जवळपास ५० रॉकेट डागले होते. मात्र, इस्रायलच्या आयर्न डोमने हा हल्ला हाणून पाडला. इराण आणि हिजबुल्लाहने सूड उगवण्याच्या घोषणेमुळे मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकण्याची शक्यता बळावली आहे.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी तातडीची बैठक बोलावली होती. पुढील घटना टाळण्यासाठी पेंटागॉनने या भागात अतिरिक्त सैन्य दल तैनात करण्याची घोषणा केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR