लातूर : प्रतिनिधी
राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार जनमताने सत्तेवर आलेले नाही यामुळे ‘ईव्हीएम’ बाबत सर्वस्तरातून वेगवेगळ्या मतदान केंद्रावर शंका व्यक्त होत आहेत. या सर्व शंकाचे निरसन निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे. परंतु, ते केले जात नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी लातुर शहरातील बार्शी रोडवरील संविधान चौक येथे ‘ईव्हीएम’ विरोधात ‘ईव्हीएम’ हटाओ लोकशाही बचाओ स्वाक्षरी अभियान करण्यात आले. या अभियानास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी महापौर अॅड. दीपक सूळ, विलास बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष इम्रान सय्यद, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, दगडू मिटकरी, राजकुमार जाधव, कैलास कांबळे, डॉ. बालाजी सोळुंके, दत्ता सोमवंशी, नागसेन कामेगावकर, मुन्ना शिंदे, विजय गायकवाड, संजय ओहोळ, बिभिषण सांगवीकर, धनंजय शेळके, गणपत राठोड, अॅड. गणेश कांबळे, भालचंद्र सोनकांबळे,राजू गवळी, काशिनाथ वाघमारे, पिराजी साठे, किरण बनसोडे, हरीश वाघमारे, प्रा. शिवशरण हावळे, श्रीनाथ माने, अॅड. कल्पना मोरे, शीलाताई वाघमारे, लहू वाघमारे. अनिता रसाळ, मंदाकिनी शिखरे, सुकेशनी गोडबोले, शोभाताई ओव्हाळ, मीनाताई टेंकाळे, सुमन चव्हाण, पवन गायकवाड, सोमेन वाघमारे, विष्णू धायगुडे, अभिषेक पतंगे, रामकिशन शिंदे, लतेश आवटे, सुनील कांबळे, आशुतोष मुळे, राम स्वामी, जालिंदर बर्डे, बब्रुवान गायकवाड, श्रीकांत गर्जे, राजे निंबाळकर, मिलिंद घनगावे, सचिन कराळे, नागेश जोगदंड, चंद्रकांत साळुंके, हुसेन नाईकवाडे, विक्की सरकार, किरण जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.