31.1 C
Latur
Saturday, March 22, 2025
Homeलातूरई-केवासीअभावी २१ कोटी ७७ लाखांचा निधी पडून

ई-केवासीअभावी २१ कोटी ७७ लाखांचा निधी पडून

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२४ मध्ये माहे जून ते आक्टोबर २०२४  या कालावधीत लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतक-यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ४६६ कोटी ४० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी वाटपाची कार्यवाही डीबीटी प्रणालीमार्फत सुरु आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ५०५ लाभार्थी मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यापैकी ३ लाख ५० हजार ३७३ लाभार्थ्यांना ३८७ कोटी ३४ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच २४ हजार ३८२ शेतक-यांनी अद्याप ई-केवायसी न केल्याने रक्कम २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरीत करणे शिल्लक आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामार्फत ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतक-यांची गावनिहाय यादी संबंधित गावच्या ग्रामपंचायतीचे ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच याबाबत दवंडी व वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन शेतक-यांना ई-केवायसी पूर्ण करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी ज्या शेतक-यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतक-यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे संपर्क साधून व्हीके नंबर प्राप्त करुन घेऊन नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन ई-केवायसी २५ मार्च २०२५ पूर्वी पूर्ण करुन घ्यावी. संबंधित शेतकरी यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच शासनाकडून डीबीटीपर्यंत शेतक-यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे. तरी जे शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत व अद्याप पर्यंत ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतक-यांनी मुदतीत ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामाफत करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR