हिंगोली : उंटाची अवैध वाहतूक करणा-यांवर पोलिसांना कारवाई करण्यात यश मिळाले आहे. आयशर चालकासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयशरमधून १६ उंटांची निर्दयीपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी कारवाई करत १६ उंटांची सुटका केली आणि आरोपींना ताब्यात घेतले. तस्करीसाठी निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली.
आखाडा बाळापूर पोलिसांच्या वतीने रात्रगस्तीचे काम सुरू असताना हिंगोली-नांदेड रोडवर एका आयशरमधून १६ उंटाची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले हे उंट कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी २१ लाख रुपयाचा मुद्देमालासह वाहन चालक, उंट आणि आयशर ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. जरोडा शिवारातील टोल नाक्यावर एका आयशरमधून उंटाची वाहतूक केली जात होती. पोलिसांच्या तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आला. या प्रकरणी मध्य प्रदेश येथील आरोपीसह एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.