27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीय विशेषउच्च रक्तदाबाचे आव्हान

उच्च रक्तदाबाचे आव्हान

अलीकडील काळात हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाने त्रस्त असणा-यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पूर्वी रक्तदाबाची पातळी ८० आणि १२० ही सामान्य मानली जात होती; पण अमेरिकी हार्ट असोसिएशनने यात बदल करत ही मर्यादा ७० आणि ११० अशी निश्चित केली आहे. अ‍ॅथेलिट किंवा चांगली जीवनशैली अंगीकारणा-या लोकांचा रक्तदाब हा ६० आणि १०० असल्याचे निदर्शनास आले आहे. ही मर्यादादेखील सामान्यच मानायला हवी; परंतु ती ओलांडल्यास तपासणीची गरज भासते. हायपरटेन्शन हा काही आजार नाही; परंतु काही आजारांचे लक्षणं आहे, हे समजून घेतले पाहिजे.

पल्या रक्तवाहिन्यांत रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी एक सामान्य दबाव असणे गरजेचे असते; पण गरजेपेक्षा अधिक ताण किंवा दबाव राहिल्यास त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन, असे म्हणता येईल. साधारणपणे उच्च रक्तदाबाला एखाद्या आजारासारखे मानले जाते आणि डॉक्टरदेखील त्यानुसार उपचार करताना दिसतात. पूर्वी रक्तदाबाची पातळी ८० आणि १२० ही सामान्य मानली जात होती; पण अमेरिक हार्ट असोसिएशनने यात बदल करत ही मर्यादा ७० आणि ११० अशी निश्चित केली आहे. अ‍ॅथेलिट किंवा चांगली जीवनशैली अंगीकारणा-या लोकांचा रक्तदाब हा ६० आणि १०० असल्याचे निदर्शनास आले आहे. ही मर्यादादेखील सामान्यच मानायला हवी; परंतु ती ओलांडल्यास तपासणीची गरज भासते. हायपरटेन्शन हा काही आजार नाही; परंतु काही आजारांचे लक्षण आहे, हे समजून घेतले पाहिजे. या ताण तणावाचे आकलन करण्यासाठी रक्तदाबाला दोन गटात विभागले पाहिजे. प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेंकडरी हायपरटेन्शन. भारतात बहुतांश नागरिकांना प्रायमरी हायपरटेन्शन आहे. डॉक्टरने एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब तपासला तर तो अधिक दिसतो आणि त्यामागे विशेष कारणही नसते. याला आपण ‘इन्सेशियल हायपरटेन्शन’ असे म्हटले जाते. सेंकडरी हायपरटेन्शन म्हणजे मूत्रपिंड विकार, हृदयविकार, ट्युमरचा शोध आदी. या श्रेणीतील नागरिक दुकानदारांकडून विशेषत: पेनकिलर खरेदी करीत असतात.

अनेक औषधांमध्येही रक्तदाब वाढविणारे घटक असतात. जेवणात मीठाचे अधिक प्रमाण असणेदेखील सेंकडरी हायपरटेन्शनचे कारण राहू शकते. साधारणपणे आपली जीवनशैली चांगली नसली तरी हृदय मात्र चांगले काम करीत असते मात्र काही कारणांमुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि रक्तदाब वाढतो. आधुनिक उपचार पद्धतीत त्यावर उपाय असून औषध देत रक्त पातळ केले जाते आणि हायपरटेन्शन कमी केले जाते. अशा स्थितीत अड्रिनलीन हे शरीराच्या अन्य भागात मेंदू, हृदय, मूत्रपिंड आदींवर परिणाम करते. अर्थात रक्तवाहिन्या आकुंचित का झाल्या हे पाहिले पाहिजे. एखादा व्यक्ती लठ्ठ असेल तर त्याला रक्तदाबाची तक्रार राहू शकते.

भरपूर कॅलरीयुक्त आहार, पिझ्झा, बर्गर, प्रोसेस्ड फुड, चरबीयुक्त आहार, मीठ, साखरेचे अतिसेवनदेखील रक्तदाबाला निमंत्रण देऊ शकते. अशा व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह, कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. लठ्ठपणा वाढल्याने अधिक इन्सुलिन तयार होऊ लागते. इन्सुलिनचे काम ग्लुकोज कमी करण्याचे असते. आपण यास वारंवार वाढवत असाल तर तो शरीरात सोडियम आणि पाणी जमा करेल आणि परिणामी हायपरटेन्शनला ते कारणीभूत राहू शकते. ६० ते ८० किलो वजन असणा-या व्यक्तीने दररोज ६ ग्रॅम मीठाचे सेवन करायला हवे. खूप साखर खाणेदेखील इन्सुलिन वाढवणारे ठरते आणि त्यामुळे रक्तदाबही वाढतो. या सवयीने लोकांची जीवनशैली सुस्त होते त्यामुळे आपण प्रत्येकाने आहाराची सूत्रे सांभाळतानाच अर्धा तास तरी व्यायाम करायला हवा. या व्यायामाचा अर्थ जीम नाही. सामान्य व्यायाम, जसे फिरणे, पळणे, पोहणे, सायकल चालविणे आदी त्यामुळे उच्च रक्तदाब थांबवता येणे शक्य आहे. दररोज १० ते १२ हजार पावले चालले तर रक्तदाबच नाही तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

तणाव हा हायपरटेन्शनचे एक मोठे कारण आहे. शहरातील आयुष्य धावपळीचे आहे. त्यात ताणतणाव असणे स्वाभाविक आहे. यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण तणावामुळे एड्रिनलिनबरोबरच आणखी एक हार्मोन तयार होतो आणि तो सोडियम आणि पाणी जमा करत लठ्ठपणाला निमंत्रण देतो. याला अनियमित आहार आणि सुस्तपणा या दोन्ही गोष्टी जोडल्या पाहिजेत. शरीरातील तणाव हा खूपच चिंताजनक असण्याचे एक कारण राहते शिवाय मद्यपान आणि धूम्रपानदेखील उच्च रक्तदाबाचे कारण आहे. उच्च रक्तदाब हा एकप्रकारे अनियोजित जीवनशैलीचे देणं आहे. जसजशी निष्काळजीपणाची जीवनशैली वाढेल तसतशी हायपरटेन्शनची समस्या आणखी गंभीर होईल आणि आजारपणाचे ओझे वाढत राहिल. कधी काळी मातीच्या तसेच लोखंडाच्या, पितळ्याच्या भांड्यात स्वयंपाक केला जायचा. आता पॉलिश केलेल्या नॉनस्टिक भांड्यांचे प्रस्थ वाढले आहे. अशा भांड्यांतील काही तत्त्व मेटाबॉलिक सिंड्रोमला कारणीभूत ठरतात. या सिंड्रोममध्ये हायपरटेन्शनबरोबरच मधुमेह होण्यास हातभार लावतो. प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या गरम भोजनाचे सेवनदेखील धोकादायक आहे आणि ही स्थिती फास्टफुडसारखीच आहे.

बाजारात मिळणा-या बहुतांश खाद्यपदार्थांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात मीठाचा अधिक वापर केला जातो. मीठाचा प्रभाव कमी करण्यासाठी साखर टाकली जाते. साखरेची चटक ही एक प्रकारे धूम्रपानाची सवय लागण्यासारखीच आहे. अशा पदार्थांचे जेव्हा दुस-या दिवशी सेवन करतो तेव्हा त्यातून आणखी रासायनिक तत्त्व बाहेर पडतात. यानुसार आपली जीवनशैली आणखी संकटात सापडते. एकंदरीतच आजारपणाचा थेट संबंध हा आपल्या जीवनशैलीशी आणि सवयीशी आहे. साधे, सरळ राहणीमान हे आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य प्रदान करते.

-डॉ. अंशुमन कुमार, वैद्यकीय तज्ज्ञ

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR