19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरउड्डाणपूल भूसंपादन पुन्हा रखडले, पालकमंत्र्यांसोबत होणार बैठक

उड्डाणपूल भूसंपादन पुन्हा रखडले, पालकमंत्र्यांसोबत होणार बैठक

सोलापूर : जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक या उड्डाणपुलाचे भूसंपादन पुन्हा रखडले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर सक्तीने भूसंपादन करायचे की तोडगा काढायचा यावर चर्चा होणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जून २०१५ मध्ये सोलापूर आणि नागपूरसाठी उड्डाणपूल मंजूर केले होते. नागपूरमधील उडाणपूल पूर्ण झाले. शहरातील उड्डाणपुलाचे भूसंपादन अद्यापही झालेले नाही. जुना पुना नाका ते पत्रकार भवन या मार्गावरील सर्व बाधित मिळकतींचे सर्वेक्षण भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांनी पूर्ण केले आहे.

बाधितांना नुकसान भरपाई देण्याची रक्कमही निश्चित झाली आहे. परंतु, काही मिळकतदारांनी जागा ताब्यात देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. या मार्गावर सरकारी जागाही आहे. सरकारी जागेचा मोबदला मिळावा अशी मागणी काही सरकारी विभागांनी केली आहे. या दोन्ही अडचणींवर ठोस निर्णय न झाल्यामुळे भूसंपादन रखडल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे. सरकारी जागा कशा पद्धतीने घ्यायचा याचा निर्णय या बैठकीनंतर होईल. ही बैठक लवकरच होईल.असे महापालीका नगररचना सहायक संचालक संभाजी कांबळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR