22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरउत्पन्न वाढीसाठी सोलापूर विभागातील एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबे द्या,प्रवासी सेवा संघाची मागणी

उत्पन्न वाढीसाठी सोलापूर विभागातील एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबे द्या,प्रवासी सेवा संघाची मागणी

सोलापूर –
सोलापूर विभागातील दौंड ते मनमाडपर्यंतचा रेल्वे मार्ग पुणे विभागास जोडला जाणार असल्याने सोलापूर विभागातील प्रवासी उत्पन्नामध्ये मोठी घट होणार आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्न वाढीसाठी सोलापूर विभागात धावणाऱ्या विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मंजूर करावे, अशी मागणी प्रवासी सेवा संघाने रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकात अनारक्षित तिकीट विभागामध्ये रेल्वे गाड्यांचे स्टेशन निहाय प्रवासी भाडे दरफलक लावण्यात यावेत, आरक्षण विभागामध्ये सर्व रेल्वे गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रकाचे फलक लावावे, हुतात्मा एक्स्प्रेसच्या प्रवासी बोगींची रचना एकसमान ठेवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.

तसेच या गाडीत एक अनारक्षित कोच जोडावा. सोलापूर विभागातील रायचूर-विजयपूर, वाडी-सोलापूर या डेमू पॅसेंजर रेल्वे गाड्या नेहमी उशिरा धावत असल्याने प्रवाशांची खूपच गैरसोय होत आहे. या गाड्या निर्धारित वेळेत चालविण्याच्या दृष्टीने नियोजन व्हावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय सोलापूर विभागात धावणाऱ्या मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसला कुडूवाडी येथे, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला जेऊर येथे, मुंबई-सातारा एक्स्प्रेसला मोडनिंब येथे तर मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेसला दुधनी येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR