रेणापूर : प्रतिनिधी
येथील रेणुका मातेची भक्तीमय व उत्साही वातावरणात अश्विन शुद्ध प्रतिपदेला गुरुवारी दि ३ ऑक्टोबर आदिशक्ती श्री रेणुका देवी मातेची घटस्थापना मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा मंजुषा भगत यांच्या हस्ते करण्यात आली .
लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील भक्तांचे हे आराध्य दैवत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत श्री रेणुका मातेचा नवरात्र उत्सव भक्तीमय व उत्साही वातावरणात साजरा करण्याची परंपरा आहे. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रतिपदेला घटस्थापना, नवमीला घटोत्थापन आणि दस-या दिवशी सीमोउल्घनांचा कार्यक्रम संपन्न होतो. देवस्थानच्या अध्यक्ष तथा तहसीलदार मंजुषा भगत व कार्यकारी अध्यक्ष राम पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली .परंपरागत पुजारी राजुभाऊ धर्माधिकारी यांच्या मंत्रघोषात धार्मिक विधी व आई राधा उदो उदो च्या जयघोषात पुजा करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार श्रावण उगले, ट्रस्टचे कार्याध्यक्ष राम पाटील, पोलिस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, आर.एस. जाधव, मंडळ अधिकारी गायकवाड, तलाठी विकास बुबने, ट्रस्टचे पदाधिकारी तुकाराम कोल्हे, म.शं. हलकुडे, गुरसिद्ध उटगे, बापू गीरी, रामाकांत वाघमारे, अॅड . प्रशांत आवनगीरे, पंडीत माने, दिलीप आकनगीरे, शहाजी कातळे, राजकुमार पुनमाळे, पुंडलीक इगे, मनोहर व्यवहारे , रावसाहेब राठोड, रमजान मुंडे, गोंिवंद राजे, कुमार पाटील,अॅड. देविदास कातळे, उमेश सोमाणी, दत्ता गोंधळी, सुरेश घडसे, लिमन पनुरे, सुभाष हाके, नारायण इगे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) विजयादशमी सिमोलंघन होऊन श्री रेणुका देवीच्या पालखी मिरवणुकीने नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे
दरम्यान जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी घटस्थापनेनंतर दुपारी ३ वाजता ग्रामदैवत श्री रेणुका देवी मंदिला भेट देऊन आरती करीत दर्शन घेतले. यावेळी तहसिलदार मंजुषा भगत, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष राम पाटील, सचिव नायब तहसिलदार सुभाष कानडे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक अनिता आलगुले, पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे , तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर रेड्डी, नगरपंचायतीचे अभियंता मंगेश देशमुख , स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ आचार्य आदी उपस्थित होते.