उदगीर : प्रतिनिधी
येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि २०) रोजी पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहत्यि संमेलनात राज्यभरातील पत्रकार साहित्यीक हजेरी लावणार असून दिवसभर उदगीरकरांना बौद्धिक व सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. सकाच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते संमेलन स्थळ संविधान ंिदडी निघणार आहे. यानंतर उदघाटन सोहळा मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते पार पडणार आहे. संमेलन अध्यक्ष म्हणून सोलापूर येथील आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या पत्रकारीता विभागाचे माजी प्रमुख जेष्ट पञकार डॉ. रवींद्र चिंचोलकर हे उपस्थित राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून मंत्री संजय बनसोडे हे उपस्थित राहतील.
प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी खासदार सुधाकर शृंगारे, शरद पाबळे, बसवराज पाटील नागराळकर, मिंिलद आष्टीवकर, दिलीपकुमार गायकवाड, अनिल वाघमारे, डॉ. सुधीर जगताप, नृंिसग घोणे, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, अमित बापूराव राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी संपादक (स्व. ) व्यंकटराव सगर वृतनिवेदक विलास बडे यांच्या अधक्षतेखाली आधुनिक काळातील पत्रकारांपुढील आव्हाने हा परिसंद होणार आहे. पत्रकार दिलीप वाघमारे, सुनील क्षीरसागर, माधव सावरगावे, चेतन धनुरे, विनायक चाकूरे, एजाज शेख आदी सहभागी होणार आहेत. यानंतर संपादक, कवी( स्व.) लक्ष्मीकांत हलकीकर, पंकज दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. यात साहित्य पत्रकार पूजा काळे, भीमराव गवळी, माधव डोळे , सुरेश ढमके (मुंबई ), संजय ऐलवाड (पुणे), रागिणी पवार (अंबेजोगाई), रामदास केदार, भरतकुमार गायकवाड, शंकर बोईंवाड (उदगीर) हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी पुरस्कार वितरण व समारोप सत्र अध्यक्षपदी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रेस फोटोग्राफर प्रतिनिधी अभिजित गुर्जर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार वितरण प्रसंगी एस. एम. देशमुख, संमेलन अध्यक्ष रवींद्रचिंचोलकर, नामदार संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकरी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमया मुंडे, जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर , गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, विश्वजित गायकवाड, मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सागर सुरेश महाजन, सुरेश नाईकवाडे, बाळासाहेब पाटोदे, मन्सूरभाई शेख, सचिन मिटकरी, विजय जोशी, अभिषेक शिंदे, राजकुमार पुजारी ,युवराज धोतरे आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. बिभीषन मद्देवाड, सचिन शिवशेट्टे, श्रीनिवास सोनी, सुनिल हावा पाटील ,अर्जुन जाधव, सिध्दार्थ सुर्यवंशी, नागनाथ गुट्टे यांनी केले आहे.