27 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeलातूरउदगीरच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे यांनी स्वीकारला पदभार

उदगीरच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे यांनी स्वीकारला पदभार

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युती विजयी होऊन थेट जनतेतून उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सौ. स्वाती सचिन हुडे या मताधिक्याने विजयी झाल्या. माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी आ. संजय बनसोडे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहरातील २० प्रभागांतील ४० नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भगवानराव पाटील तळेगावकर, सुधीर भोसले, माजी नगरसेवक सचिन हुडे, मंजुर पठाण, ज्येष्ठ नागरिक शंकर हुडे,  वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अमोल अनकल्ले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आजपासून नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहून सेवा करावी व आपली नगर परिषद ही लातूर जिल्ह्यात नंबर एकची नगर परिषद म्हणून नावारुपास आणावी असे आवाहन केले.
जगाच्या नकाशावर आपल्या उदगीरची एक नवी ओळख निर्माण झाली असून आपली संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी करावे. विकासाच्या कामासाठी हातात हात घालून कामे करा आणि शहरातील सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा पुरवा, असे सांगितले. येत्या सहा महिन्याच्या आत नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात करणार असून  एक देखणी इमारत आपण उभारणार असल्याचेही आ.संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR