लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील नामांकित बाजार पेठे पैकी एक बाजार पेठ असलेल्या उदगीर बाजार पेठेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात सभापती तत्कालीन संचालक व तत्कालीन सचिव यांनी कोट्यावधी रूपयाचा गैरव्यवहार केल्याचे लेखा परिक्षन अहवालातूनच समोर आले आहे. संबधिताना जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी नोटीसा बजावून खुलासा ही मागीतला आहे मात्र या प्रकरणी कारवाई मात्र गुलदस्त्यातच अडकल्याचे दिसून येत आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळातील सन २०२१-२२ व २०२२-२३ या अथिक वर्षात तत्कालीन सभापती व काही संचालकांनी तत्कालीन सचिव याच्याशी संगनमत करून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०२१-२२ व २०२२-२३ या अर्थिक वषाचे लेखा परिक्षणाचे आदेश पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि. २५ ऑग्सट २०२३ रोजी काढले होते व या कामी लेखा परिक्षक म्हणून जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-सहकारी संस्था लातूरचे यु. एल. पवार यांची उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे लेखा परिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात लेखा परिक्षक यु. एल. पवार यांनी लेखा परिक्षण केले असून या लेखा परिक्षणात सन २०२१-२२ व २०२२-२३ या अथिक वर्षात तत्कालीन सभापती व काही संचालकांनी तत्कालीन सचिव याच्याशी संगनमत करून कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले असून या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु.एल. पवार यांनी तत्काली सभापती, सचिव व संचालक यांना दि. ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी नोटीसा बजावत संबधितावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवत आपन तसेच सचिव संचालक मंडळ जबाबदार असल्याचे नमुद करत गैरव्यहारातील सदरची रक्कम ७ दिवसाच्या आत भरणा करावी व या बाबतचा समर्पक व कागदोपत्री पुराव्यानिशी या कार्यालयास ७ दिवसाच्या आत सादर करावा अपला खुलासा समर्पक व कागदोपत्री नसल्यास आपना विरूध्द पुएील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी असे ही नुमद केले आहे पण या प्रकरणाची कारवाईच गुलदस्त्यात अडकल्याने हे प्रकरण उदगीर तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा विषय बनले आहे.